Mumbai news Marathi news grapes rate in Mumbai
Mumbai news Marathi news grapes rate in Mumbai

द्राक्षांना दहा किलोला 1200 रुपये भाव

नवी मुंबई : थंडीबरोबरच द्राक्षांचा हंगामही सुरू झाला असून, वाशी येथील फळबाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या सीडलेस द्राक्षांना अधिक मागणी असून, प्रति दहा किलो 800 ते 1200 रुपयांपर्यंत दर आहे. 
यंदा परतीच्या पावसाचा फटका बसल्याने द्राक्षांचा हंगाम काही दिवसांसाठी लांबला. अखेर नाशिक व सांगलीतील तासगाव परिसरातून द्राक्षे बाजारात दाखल झाली आहेत. सध्या हिरवी द्राक्षे बाजारात येत असून, काही दिवसांनंतर काळी द्राक्षे बाजारात येण्यास सुरवात होईल. सध्या सोनाक्का व शरद सीडलेस द्राक्षांची आवक होत आहे. त्यात सोनाक्का जातीच्या द्राक्षांच्या दहा किलोच्या टोपलीला 400 ते 800 रुपयांचा दर मिळत आहे; तर शरद सीडलेसला 800 ते 1200 पर्यंत दर आहे. येत्या एप्रिलपर्यंत हंगाम सुरू राहण्याची अपेक्षा असून, डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात आवक होईल. या काळात दर कमी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती व्यापारी शिवाजी चव्हाण यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com