दादरच्या फेरीवाल्यावर गुन्हा दाखल

Mumbai News Marathi news hawkers in Mumbai Dadar
Mumbai News Marathi news hawkers in Mumbai Dadar

मुंबई : दादर रेल्वेस्थानकाशेजारी बसलेल्या फेरीवाल्यांविरोधात बुधवारी (ता. 15) शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रेल्वेस्थानकाचा 150 मीटर परिसर फेरीवालामुक्त ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. बुधवारी रात्री 10 च्या सुमारास
रमेशकुमार वैश्‍य हा फेरीवाला दादर पश्‍चिम येथील केशवसुत पुलाखाली व्यवसाय करीत होता. त्याला पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. पोलिसांनी त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा
आणल्याचा गुन्हा दाखल केला. दोनच दिवसांपूर्वी दादरमध्ये फेरीवाल्यांना अभय दिले म्हणून पालिकेच्या वाहन निरीक्षकाला एक दिवसासाठी निलंबित केले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com