हिराबाई पेडणेकर चरित्रग्रंथ प्रकाशित

Mumbai News Marathi News Hirabai Pednekar drama book
Mumbai News Marathi News Hirabai Pednekar drama book

मुंबई : ज्यांचे संगीत दामिनी हे नाटक 105 वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले, त्या आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनातील अनेक अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या शिल्पा सुर्वे लिखित "आद्य महिला नाटककार हिराबाई
पेडणेकर' या संशोधनपर चरित्रग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी (ता. 17) नाट्य परिषदेचे कार्यवाह अभिनेते दीपक करंजीकर यांच्या हस्ते झाले. 

या वेळी साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक सुनील कर्णिक, नाट्य लेखक प्रवीण धोपट आणि डिंपल पब्लिकेशनचे कौतुक मुळे आदी उपस्थित होते. यानिमित्त उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग,
ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात दोनदिवसीय ग्रंथोत्सव भरवण्यात आला आहे. त्याची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडीने आणि दीपक करंजीकर यांच्या मुलाखतीने झाली.

या ग्रंथाच्या निमित्ताने उपेक्षित महिला कलावंत आणि तिचे कार्य समाजाला ज्ञात होईल, अशी अपेक्षा करंजीकर यांनी व्यक्त केली. घरोघरी वर्तमानपत्रे टाकून जोपासलेली वाचनाची आवड, अभिनेत्यापर्यंतचा प्रवास करंजीकर यांनी उलगडला.
नाट्य परिषदेचा कार्यवाह म्हणून काम करताना 500 नाटकांच्या संहितांचे डिजिटायजेशन केले आहे, त्यामुळे हा दस्तावेज कायमस्वरूपी जतन झालाय, असे त्यांनी सांगितले. त्यांच्याशी प्रवीण धोपट यांनी संवाद साधला. 
शिल्पा सुर्वे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ज्या काळात स्त्रिया रंगभूमीवर कामही करत नव्हत्या, त्या काळात एका महिलेने नाटक लिहिण्याचे धाडस केले आणि इतिहास रचला. हिराबाईंचे कार्य जाणून घेणे ही त्यांना वाहिलेली खरी
श्रद्धांजली आहे, असे त्या म्हणाल्या. 

रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या "वंचितांचा रंगमंच' या चळवळीतील कलाकारांचा मराठी भाषाविषयक नृत्याविष्कार सादर झाला. ग्रंथोत्सवात शारदा मंगल कार्यालय इमारतीच्या पटांगणात ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात
आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com