केडीएमसी : खासगी ठेकेदाराकडून करा पाणीबिलाची वसुली

Mumbai News Marathi News KDMC News Water Billing Municipal Corporation
Mumbai News Marathi News KDMC News Water Billing Municipal Corporation

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या पाणीबिलाची वसुली खासगी ठेकेदाराकडून करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेकडे पाठवला आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे पूर्ण क्षमतेने वसुली होण्यात अडचणी येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. खासगी ठेकेदाराकडून वसुली झाल्यास जकातीप्रमाणे पाणीबिल वसुलीचा आकडा वाढेल, अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

कल्याण-डोंबिवली पालिका; तसेच 27 गावे या परिसराला दररोज 345 दशलक्ष लिटर्सचा पाणीपुरवठा होतो. यानुसार थकबाकीसह पाणीबिलाची 75 कोटींची वसुली झाली पाहिजे; मात्र गेल्या तीन वर्षांच्या आकड्यांवर नजर टाकली तर ती कमी आहे. 

2014-15 या वर्षात 49.39 कोटी, 2015-16 मध्ये 57.21 कोटी; तर 2016-17 मध्ये 55.42 कोटी असे पाणीबिल वसुलीचे आकडे आहेत. अपेक्षित उत्पन्नापेक्षा हे आकडे फारच कमी असल्याने खासगी ठेकेदारातर्फे ही वसुली करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव सादर करताना गेल्या वर्षाच्या वसुलीचे आकडे ग्राह्य मानून 60 कोटींची निविदा काढण्याची बाबही प्रस्तावात मांडण्यात आली आहे. पाणीपुरवठ्याच्या तुलनेचा विचार करून अपेक्षित उत्पन्न 75 कोटी इतके असताना खासगी ठेकेदाराला वसुलीचा आकडा 60 कोटी इतका कमी देण्यात आल्याने या विषयावर जोरदार चर्चा अपेक्षित आहे. 

कर्मचाऱ्यांचा तुटवडा 
सध्या पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात 115 कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत; मात्र येथे 178 कर्मचारी-अधिकारी आवश्‍यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा थेट परिणाम बिलवसुलीवर होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. खासगी ठेकेदाकडून बिल वसुलीबरोबरच मीटर रीडिंग, त्याची संगणकीय नोंद, मीटरची देखभाल दुरुस्ती, जोडण्यांच्या संदर्भातील सर्व कामे करून घेण्याची सूचना प्रस्तावात करण्यात आली आहे. हा ठेका दोन वर्षांच्या कालावधीसाठी दिला जावा. नैसर्गिक वाढीच्या नियमानुसार त्यात वाढ करावी, असेही नमूद करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com