माथेरानची राणी आजपासून धावणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

मुंबई - वर्षभरापासून बंद असलेली माथेरानची राणी पुन्हा एकदा पर्यटकांच्या सोयीसाठी सज्ज झाली आहे. अमन लॉज ते माथेरानदरम्यान सोमवारपासून (ता. 30) या मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू करण्यात येणार आहे. रविवारी (ता. 29) नेरळ ते माथेरानदरम्यान तिची यशस्वी चाचणी घेण्यात आली. माथेरानची राणी अशी ओळख असलेली मिनी ट्रेन 1 आणि 8 मे 2016 अशी दोन वेळा रुळावरून घसरली होती. ती बंद असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी होतीच; शिवाय स्थानिकांचीही त्यामुळे गैरसोय होत होती. अखेर इंजिनात सुधारणा केल्यानंतर आज तिची चाचणी घेण्यात आली. माथेरानदरम्यानच्या प्रवासासाठी मध्य रेल्वेने भाड्यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही.
टॅग्स