मर्चंट नेव्ही कप्तानांच्या संघटनेचे स्नेहसंमेलन उत्साहात

merchant navy
merchant navy

मुंबई : मास्टर मरीनर्स ऑफ महाराष्ट्र (एमएमएमएच) या महाराष्ट्रातील मर्चंट नेव्ही कप्तानांच्या संघटनेचे स्नेह-संमेलन, ट्रेनिंग शिप रहेमान, न्हावे येथे उत्साहात पार पडले.

एमएमएमएच ही भारतीय नौवहन व संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यापारी जहाजांच्या कप्तानांची संघटना आहे. व्यापारी जहाजांवर कार्यरत असणाऱ्या अनेक कप्तानांशिवाय, भारतीय व परदेशी व्यापारी जहाज उद्योगात काम करणारे अनेक वरिष्ठ पदाधिकारी या संघटनेचे सभासद आहेत. एक व्हॉट्सऍप समूह म्हणून सुरु झालेली ही संघटना, आज या क्षेत्रातील मराठी अधिकारी व खलाशी यांना सर्वतोपरी सहाय्य करणारी एक सेवाभावी संघटना म्हणून ओळखली जाते.

नौवहन क्षेत्रातील अनेक मान्यवर, अनुभवी व्यावसायिक या संघटनेचे सभासद आहेत. या क्षेत्रासंदर्भात विविध प्रकारची माहिती, सल्ले, तसेच या क्षेत्रातील विविध नोकऱ्या इत्यादी संदर्भात बहुमुल्य मार्गदर्शन आणि मदत एमएमएमएच ने आतापर्यंत अनेक मराठी तरुणांना उपलब्ध करून दिली आहे. जहाज तसेच बंदर उद्योग क्षेत्रातील मराठी व्यावसायिकांना परस्पर सहकार्यासाठी तसेच, या संबधित विविध प्रश्नाबाबत विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून एमएमएमएच कार्यरत आहे.

ट्रेनिंग शिप रहेमान या 105 वर्षांचा इतिहास लाभलेल्या भारतातील सर्वात जुन्या मर्चंट नेव्ही प्रशिक्षण संस्थेत साजरे झालेले हे स्नेहसंमेलन सभासदांच्या कुटुंबियांसमावेत आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरे झाले. या कार्यक्रमांतर्गत सर्व उपस्थितांनी संस्थेतील वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. या निमित्ताने आयोजित केलेल्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात सर्वांनी उत्साहाने भाग घेतला. प्रशिक्षण संस्थेतील हॉटेल व्यवस्थापन कोर्सच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत रुचकर भोजनाची मेजवानी देऊन उपस्थितांची शाबासकी मिळविली. तेथील प्रशिक्षणार्थी कॅडेट्सनी केलेले शिस्तबद्ध स्वागत, आदरातिथ्य उपस्थितांचे मन जिंकून गेले. उत्कृष्ट नियोजनाचा एक नमुना वाटावा अशा या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी एमएमएमएच संघटनेतर्फे ट्रेनिंग शिप रहेमान प्रशिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक कॅप्टन आशुतोष अपंडकर ह्यांचा, भारताचे माजी नाविक सल्लागार व ज्येष्ठ कप्तान पी. एस. बर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मरीन ईन्शुरन्स क्षेत्रातील तज्ञ कॅप्टन एस. एम दिवेकर, प्रेजिडेंट टेक्नॉलॉजी चे उपाध्यक्ष कॅप्टन केदार परांजपे  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com