मेट्रो-3 चे काम रात्री करण्यास मनाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई -  अवजड वाहनांचा वापर करून कुलाबा-सीप्झदरम्यानच्या "मेट्रो-3' प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळेस करण्यास केलेली मनाई मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली. 

मुंबई -  अवजड वाहनांचा वापर करून कुलाबा-सीप्झदरम्यानच्या "मेट्रो-3' प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळेस करण्यास केलेली मनाई मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली. 

मेट्रो 3 चे काम रात्रीच्या वेळेस करण्यास विरोध दर्शवणारी जनहित याचिका दक्षिण मुंबईतील काही नागरिकांनी दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळातर्फे रात्री अवजड वाहने आणि यंत्राच्या साह्याने डेब्रीज व अन्य कामे करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. ती परवानगी देण्यास न्यायालयाने नकार दिला. दिवसभर काम केल्यानंतर नागरिकांना शांत झोप मिळणे आवश्‍यक असते, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. 

Web Title: mumbai news metro-3