मेट्रोचे तिकीटही ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मुंबई - केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर विविध क्षेत्रांत डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत आहे. भारतीय रेल्वेची तिकिटे मिळवण्यासाठीही डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत असून, आता मेट्रोचे तिकीटही ऑनलाइन मिळणार आहे. याकरिता मोबाईल वॉलेट असलेल्या "मोबिक्विक'ने डिजिटल तिकीट प्रणालीसाठी "मुंबई मेट्रो वन'सोबत भागीदारी केली आहे.

मेट्रोच्या प्रमुख रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्‍यांवर काही प्रमाणात गर्दी होते. यात प्रवाशांचा काही वेळ वाया जातो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असल्याने मोबिक्विकने डिजिटल तिकीटप्रणाली सुरू केली आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो 1 मार्गावरील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

Web Title: mumbai news metro ticket online