पर्यायी घरांमध्ये जाण्यास  कन्नमवारवासीयांचा विरोध 

पर्यायी घरांमध्ये जाण्यास  कन्नमवारवासीयांचा विरोध 

मुंबई - विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगरातील म्हाडाची संक्रमण शिबिरे मोडकळीस आली आहेत. त्यामुळे इमारतींमधील रहिवाशांच्या वास्तव्याची व्यवस्था म्हाडाने गोराई येथील संक्रमण शिबिरासह कन्नमवार नगरामध्येच नवीन संक्रमण शिबिरात केली आहे. मात्र, या संक्रमण शिबिरांमध्ये जाण्यास रहिवासी तयार नसल्याने रहिवाशीच जीवावर उदार असल्याचे दिसत आहे. लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे म्हाडा अधिकारी हतबल झाले आहेत. 

कन्नमवार नगरात म्हाडाची संक्रमण शिबिरे आहेत. यामध्ये शेकडो रहिवासी वास्तव्य करतात. संक्रमण शिबिराच्या इमारती जुन्या असल्याने त्या आता मोडकळीस आल्या आहेत. 14 फेब्रुवारीला एका इमारतीच्या पिलरला मोठा तडा गेला. या घटनेनंतर रहिवाशांनी घाबरून पर्यायी घराची मागणी केली. त्यामुळे धोकादायक संक्रमण शिबिरातील रहिवाशांसाठी म्हाडाने गोराई येथे घरे उभारली आहेत. या ठिकाणची घरे देण्याबाबतची प्रक्रियाही म्हाडा अधिकाऱ्यांनी पूर्ण केली. मात्र, रहिवाशांनी ही घरे ताब्यात घेण्यास विरोध दर्शविला. लोकप्रतिनिधीही राजकीय लाभापोटी धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना याच ठिकाणी राहण्यासाठी प्रेरित करत आहेत. लोकप्रतिनिधींकडून आश्‍वासने मिळाल्याने रहिवासी जीव मुठीत घेऊन याच इमारतींमध्ये वास्तव्य करत आहेत. पर्यायी व्यवस्था केल्यानंतरही रहिवासी धोकादायक इमारतींमधून बाहेर पडत नसल्याने म्हाडा अधिकारी हतबल आहेत. रहिवाशांनी सुरक्षेचा विचार करून पर्यायी घरांचा ताबा घ्यावा, असे आवाहन म्हाडा अधिकाऱ्यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com