एमआयएमचे आमदार वारीस पठाण समर्थकांसह अटकेत

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मुंबई: रास्तारोको करून वाहतुकीचा 15 मिनिटे खोळंबा केल्याप्रकरणी एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी आज (गुरुवार) अटक केली.

मुंबई: रास्तारोको करून वाहतुकीचा 15 मिनिटे खोळंबा केल्याप्रकरणी एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी आज (गुरुवार) अटक केली.

रे रोड रेल्वे स्टेशन लगत एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी आंदोलन पूर्वी एल्फिस्टन रोड येथील अपघातात मृत पावलेल्या दुर्दैवी प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करीत आंदोलनाला सुरुवात केली. आधी त्यांनी रेल्वेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना आत जाऊच दिले नाही. त्यामुळे आमदार पठाण यांनी समर्थकांसह पोलिस बैरिकेट्स ढकलून समोरील रस्त्यावर ठिय्या मांडत रेल्वे मंत्री पियूष गोयल, महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांच्यावर टिका केली. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर सर्वांना ताब्यात घेतले. रास्तारोको केल्याने वाहतुकीचा 15 मिनिटे खोळंबा झाला होता.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :