प्रतोद आमदारांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मुंबई - विधिमंडळ पक्षाच्या प्रतोदांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देणारे विधेयक विधानसभा व विधान परिषदेत शुक्रवारी मंजूर झाले.

मुंबई - विधिमंडळ पक्षाच्या प्रतोदांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देणारे विधेयक विधानसभा व विधान परिषदेत शुक्रवारी मंजूर झाले.

विधानसभा व विधान परिषदेत एकूण आमदारांच्या दहा टक्के आमदार असलेल्या पक्षाच्या प्रतोदांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय यापूर्वी सरकारने घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे विधेयक आज विधानसभेत मांडले. ते एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाच्या आठ प्रतोद आमदारांना राज्यमंत्री पदाचा दर्जा लाभला आहे. यामध्ये भाजपचे राज पुरोहित व भाई गिरकर, शिवसेनेते सुनील प्रभू व डॉ. नीलम गोऱ्हे, कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार व संजय दत्त, तर "राष्ट्रवादी'चे शशिकांत शिंदे व हेमंत टकले या प्रतोद आमदारांना आता राज्यमंत्री पदाचा दर्जा लाभला आहे.