निरुपम यांच्या घरासमोरून मनसे कार्यकर्ते ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

मुंबई - कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्‍समधील घराजवळ बसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गोरेगावमधील मनसेचे विभागाध्यक्ष वीरेंद्र जाधव तिथे गस्तीवर असलेल्या वर्सोवा पोलिसांना दिसले. त्यांनी तत्काळ त्यांना व अन्य पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.

जाधव हे पदाधिकारी आणि 15 कार्यकर्त्यांसह निरुपम यांच्या घराजवळ सकाळपासून बसले होते. त्यांच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्यांना हटकल्यावर बाचाबाची झाली. त्यांना ताब्यात घेऊन वर्सोवा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. कॉंग्रेसचे नगरसेवक शिवा शेट्टी व त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.