विमानतळाजवळ कारवाई केल्यावर बेघरांचे काय?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

मुंबई - मुंबईत विमानतळांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून चालणार नाही, पण बेघर होणाऱ्यांचे काय करणार, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.

मुंबई - मुंबईत विमानतळांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून चालणार नाही, पण बेघर होणाऱ्यांचे काय करणार, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.

विमानतळांजवळील अनेक इमारती प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून अधिक उंचीच्या बांधण्यात आल्या आहेत. यामुळे विमाने व नागरिकांच्या सुरक्षेला धोका आहे, अशी भीती व्यक्त करणारी जनहित याचिका ॲड. यशवंत शेणॉय यांनी दाखल केली आहे. त्याविषयी खंडपीठाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. मुंबई एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने (एमआयएएल) केलेल्या सर्व्हेनुसार इमारतींचे अतिरिक्त मजले, गच्चीवरील लोखंडी खांब, अँटेना यांसारख्या १३७ बाबी विमान वाहतुकीत अडथळा ठरू शकत असल्याचे लक्षात आले, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली आहे.