मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ. आंबेडकरांचे नाव द्या - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

मुंबई - पश्‍चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

आठवले यांनी नुकतीच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन ही मागणी केली. रेल्वेमंत्र्यांनीही योग्य तो निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आली. मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी आम्ही 12 वर्षांपासून करीत आहोत. व्हिक्‍टोरिया टर्मिनस आणि मुंबई विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज असे नामांतर करण्यात आले. त्याचे स्वागत आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नामांतर करण्यात यावे. मुंबईतील महाविद्यालयांत त्यांनी काही काळ अध्यापनही केले आहे. त्या वेळी त्यांनी अनेकदा मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस येथून प्रवासही केला. त्यामुळे या टर्मिनसला त्यांचे नाव दिल्यास ते उचित होईल, असे रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.