दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर यंदापासून मुंबई महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई - दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर यंदापासून मुंबई महोत्सव घेण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला आहे. 23 डिसेंबर 2017 ते 7 जानेवारी 2018 या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) सहकार्याने मिळणार आहे.

काही वर्षांपासून दुबई फेस्टिवलसाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या संख्येने दुबईवारी करतात. या काळात मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळत असल्याचे पाहणीत स्पष्ट आले आहे. त्यामुळे याच धर्तीवर देशीविदेशी पर्यटकांनी मुंबईच्या भेटीला यावे याकरिता मुंबई महोत्सव घेण्याचा सरकारचा विचार आहे. यंदाचे वर्ष पर्यटन वर्ष अर्थात "व्हिजिट महाराष्ट्र' म्हणून राज्य सरकारने घोषित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उत्सव होत आहे.

राज्याच्या पर्यटन विभागाची टॅगलाईनच "अनलिमिटेड महाराष्ट्र' अशी आहे. पर्यटकांना भरभरून देण्याची क्षमता असलेला महाराष्ट्र केवळ ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगमुळे पिछाडीवर राहिला आहे. राज्याच्या पर्यटन विकासातील हा कमकुवत दुवा हेरून पर्यटन विभाग आता प्रभावी मार्केटिंगवर भर देत आहे. त्याच उद्देशाने मुंबई महोत्सवाचा निर्णय घेण्यात आला.
- जयकुमार रावल, पर्यटन मंत्री

Web Title: mumbai news mumbai mahotsav