मुंबई मेट्रोचे वेळापत्रक आता "गुगल मॅप'वर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

मुंबई - वर्सोवा ते घाटकोपर "मुंबई मेट्रो 1' ची माहिती आता गुगलवर उपलब्ध होणार आहे. या मेट्रोची बारा स्थानके आणि सुविधा गुगल मॅप्सवर दिसतील, अशी माहिती "मुंबई मेट्रो 1'च्या प्रवक्‍त्यांनी दिली. यात मेट्रोचे वेळापत्रकही दिसणार असून प्रवाशांना त्याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

मेट्रो फेरीच्या वेळा गुगल मॅप्स या ऍपमध्ये उपलब्ध होतील. गर्दीच्या वेळी चार मिनिटांच्या अंतराने आणि इतर वेळी आठ मिनिटांच्या अंतराने धावणाऱ्या मेट्रोच्या सेवेबाबत प्रवाशांना माहिती मिळेल. सुटीच्या दिवशी सेवांचे वेळापत्रकही उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो प्रवासाचे नियोजनही योग्य प्रकारे करता येईल. याशिवाय मेट्रो स्थानकातील सरकते जिने, लिफ्ट, तिकीट खिडक्‍या अशी अन्य माहितीही मिळणार आहे.