मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल; टॅक्सी, बस, रेल्वेवर परिणाम

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

गाडयांच्या कार्बोरेटर मध्ये पाणी शिरल्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाहने बंद होती. काही टॅक्सीज आणि बेस्ट बसेस तुरळक सुरु आहेत. 

मुंबादेवी : रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने ऐन गणेशोत्सवात आपली दहशत निर्माण केलेली आहे. दक्षिण मुंबईत कफ परेड , कुलाबा ते भायखला येथे काही महत्वाच्या सखोल भागी पाणी तूंबलेले पहायला मिळाले. पाण्याचा कहर म्हणजे जे. जे. रुग्णालय येथील मुंबई महानगर पालिका बी वार्डच्या आतही पाणी तुंबल्याने कर्मचारी अधिकारी आणि नागरिकांना पाण्यातुन  वाट काढीत बाहेर यावे लागले.

गाडयांच्या कार्बोरेटरमध्ये पाणी शिरल्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाहने बंद होती. काही टॅक्सीज आणि बेस्ट बसेस तुरळक सुरु आहेत. डोंगरी जेल रोड येथील एका ईमारतीच्या कमकुवत भागाची तपासणी करण्यात  येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी सांगितले. उर्वरित माहिती इंस्पेक्शन नंतर दिली जाईल असे असे सांगितले.

दक्षिण मुंबईतील विविध शासकीय आणि खासगी अस्थापनेत काम करणारा वर्ग घरी जायला निघाला आहे. पाऊस धो धो कोसळतोय त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये असे पोलिसांनी आणि महानगर पालिका अधिकाऱ्यांनी आवाहन केलेले आहे.