मुंबई विद्यापीठ: रखडलेल्या निकालाविरोधात याचिका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

कुलगुरू, शिक्षण मंत्र्यांवर आरोप

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाला कुलगुरू आणि राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत याचिकेवर सुनावणी अपेक्षित आहे.

साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर होणारे निकाल ऑगस्ट महिना संपत आला तरीही अद्याप जाहीर झाले नसल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. इतकेच नाही, तर परदेशी शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही निकालाची आणखी काही आठवडे वाट पाहावी लागणार आहे. ऑनलाईन पेपर तपासणीला उशिरा सुरुवात झाल्याने हे निकाल रखडले असल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन असेसमेंट उशिरा सुरू केल्याने टीवाय बीए, बीएस्सी, कॉमर्स आणि इतर व्यावसायिक पदवी परीक्षेचे निकाल उशिरा लागत आहेत. याचा फटका मुंबईसह कोकणातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यासह शिक्षकांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. सचिन पवार आणि अभिषेक भट यांच्या वतीने वकील एस. बी. तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.