निकाल प्रलंबित राहिलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

मुंबई विद्यापीठाचा विचार; लवकरच निर्णय

मुंबई: निकालातील गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका बसण्याचे प्रकार सुरूच आहेत. अद्याप निकाल प्रलंबित असणाऱ्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी "सकाळ'ला दिली. "बोर्ड ऑफ स्टडीज'च्या मंगळवारी (ता. 26) होणाऱ्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

दोन आठवड्यांपूर्वी मुंबई विद्यापीठाने पत्रकार परिषदेत 28 हजार विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित असल्याचे सांगितले होते. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने दुसऱ्या गठ्ठ्यात गेलेल्या उत्तरपत्रिका शोधण्याची विद्यापीठाची कसरत झाली होती. गेल्या आठवड्यापर्यंत केवळ नऊ हजार विद्यार्थ्यांचेच निकाल शिल्लक होते. मात्र हा आकडा आता नऊ हजारांपर्यंत आल्याचा दावा डॉ. शिंदे यांनी केला. विद्यार्थ्यांच्या सत्र चार आणि पाचमधील गुणांनुसार सरासरीचे गुण ठरवले जातील. उत्तरपत्रिका शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. मंगळवारपर्यंत प्रलंबित निकाल असलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा कमी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यास राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने विरोध केला आहे.