मुंबईत 50 वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

या अवयवदानासाठी सुप्रसिद्ध डॉक्टर संजय ओक यांनी कुटूंबियांची समजूत काढली. डॉ ओक हे महिलेचे शेजारी असल्याने त्यांनी पुढाकार घेतला. अवयव दान करणाऱ्या महिलेचे हृदय, डोळे, यकृत दान करण्यात आले

मुंबई - 55 वर्षाच्या महिलेला सोमवारी रात्री मेंदूमृत घोषित केल्यानंतर कुटूंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या अवयवदानातून देण्यात आलेले हृदय साताऱ्याच्या 32 वर्षाच्या तरुणाला बसविण्यात आले. ही मुंबई-महाराष्ट्रातील 50 वे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. 

या अवयवदानासाठी सुप्रसिद्ध डॉक्टर संजय ओक यांनी कुटूंबियांची समजूत काढली. डॉ ओक हे महिलेचे शेजारी असल्याने त्यांनी पुढाकार घेतला. अवयव दान करणाऱ्या महिलेचे हृदय, डोळे, यकृत दान करण्यात आले. 37 वर्षांच्या साताऱ्यातील पुरुषाला हे हृदय बसविण्यात आले. तो एक वर्षापासून हृदयाच्या आजाराने त्रस्त होता. पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया ऑगस्ट 2015 मध्ये बदलापूर य़ेथे राहणाऱ्या तरुणावर करण्यात आली होती. 

मुंबईत सोमवारी झालेले अवयवदान हे या वर्षातील 21 वे अवयवदान आहे. या अवयवदानातील यकृत 60 वर्षाच्या कोलकात्यातील महिलेला , 27 वर्षाच्या ठाण्यातील तरुणाला किडणी देण्यात आली. तर, डोळे नेत्रपेढीत ठेवण्यात आले.