चौपाटीवरील कबुतरखान्यावर महापालिकेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मुंबई - गिरगाव चौपाटीवरील कबुतरखान्याचे सुरू असलेले बांधकाम बुधवारी (ता. ११) थांबवत महापालिकेने त्यावर कारवाई केली. कबुतरखान्यातील बांधकामाबाबत शिवसेनेने तक्रार केली होती. 

मुंबई - गिरगाव चौपाटीवरील कबुतरखान्याचे सुरू असलेले बांधकाम बुधवारी (ता. ११) थांबवत महापालिकेने त्यावर कारवाई केली. कबुतरखान्यातील बांधकामाबाबत शिवसेनेने तक्रार केली होती. 

गिरगाव चौपाटीवर कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी उच्चस्तरीय समितीची परवानगी घेणे बंधनकारक असते. समितीने परवानगी दिल्यानंतर त्याबाबतची माहिती पालिकेच्या डी प्रभाग कार्यालयात पाठवली जाते; मात्र प्रभाग कार्यालयाला असे कोणतेही पत्र आले नसल्याचा दावा पालिकेच्या एका अधिकाऱ्याने केला. कबुतरखान्यांच्या बांधकामामुळे तिथे पडलेले सिमेंट काँक्रीट हटविण्यात आले आहे. तसेच बाजूचे रेलिंग काढून टाकण्यात आले आहे, असे सहायक आयुक्त विश्‍वास मोटे यांनी सांगितले.

राजकीय कुस्ती रंगणार?
भाजपकडून कबुतरखान्याचे बांधकाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. वर्षभरापूर्वी भाजपने गिरगाव चौपाटीवर उभ्या राहणाऱ्या मासेमारी बोटींबाबत तक्रार केली होती. तेव्हा शिवसेनेने मच्छीमारांची बाजू घेतली होती. त्यामुळे गिरगाव चौपाटीच्या वाळूत शिवसेना भाजपची राजकीय कुस्ती रंगण्याची शक्‍यता आहे.

Web Title: mumbai news municipal corporation Girgaon Chowpatty