मुंबई महापालिका बांधणार आणखी 12 शाळा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई - महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत नव्या 12 शाळा बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आरक्षित भूखंडांवर या शाळा बांधण्यात येतील. याकरिता सुमारे 26 कोटी 42 लाखांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पालिकेच्या शाळांचा दर्जा घसरत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. ही गळती रोखण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. पालिकेच्या सुमारे 1 हजार 48 प्राथमिक, तर 147 माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक शाळांत 2 लाख 87 हजार 979 आणि माध्यमिक शाळांत 35 हजार 920 विद्यार्थी आहेत. याशिवाय पालिकेच्या 422 अनुदानित शाळांत 1 लाख 38 हजार 442 विद्यार्थी आहेत. अशा एकूण 1 हजार 617 शाळांत सुमारे 4 लाख 62 हजार 341 विद्यार्थी आहेत. पालिकेच्या हद्दीतील 693 खासगी विनाअनुदानित शाळांत 3 लाख 25 हजार 421 विद्यार्थी आहेत. आता 12 नव्या शाळांची भर पडणार आहे. 

मुंबईच्या विकास आराखड्यातील आरक्षित जागा मोकळ्या आहेत. नियोजन समितीने कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत, अशा ठिकाणी या शाळा बांधल्या जातील. पालिकेच्या शाळांसाठी आरक्षित असलेल्या 10 आणि पालिकेच्या ताब्यात असलेल्या इतर दोन भूखंडांवर 12 शाळा बांधण्याचे प्रस्तावित आहे. या शाळांच्या बांधकामासाठी 2017-18 च्या अर्थसंकल्पात 26 कोटी 42 लाखांची तरतूद केली आहे, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली.

Web Title: mumbai news municipal corporation school