शाहरूखच्या कंपनीवर पालिकेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुंबई - अभिनेता शाहरूख खान याच्या "रेड चिली' कंपनीतील बेकायदा बांधकामावर गुरुवारी महापालिकेने कारवाई केली. गोरेगाव येथील डीएचएल पार्कमधील चौथ्या मजल्यावर हे कार्यालय आहे. गच्चीत बेकायदा बांधकाम करण्यात आले असल्याचा दावा पालिकेने केला होता.

डीएलएच पार्क या इमारतीत "रेड चिली एंटरटेन्मेंट'चा भाग असलेल्या रेड चिलीज व्हीएफएक्‍सचे कार्यालय आहे. पालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार चौथ्या मजल्यावर मोकळी जागा ठेवण्यात आली होती; मात्र या कंपनीने मोकळ्या जागेत बांधकाम करून तिथे कॅन्टीन तयार केले होते. सुमारे दोन हचार चौरस फुटांवर हे अतिक्रमण होते. त्यावर पालिकेने कारवाई केली. या कंपनीत 316 कर्मचारी आहेत. चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्‍ट येथे केले जातात. यापूर्वी विनोदी अभिनेता कपिल शर्मा याचे बेकायदा बांधकाम गाजले होते. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि राणी मुखर्जी यांनाही पालिकेने बेकायदा बांधकामांबद्दल नोटीस पाठवली आहे.

Web Title: mumbai news municipal crime on shahrukh khan company