दक्षिण मुंबईत घटस्थापनेने नवरात्रीस प्रारंभ

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई: अश्विन शुद्ध पक्ष प्रतिपदा आदिशक्ति दुर्गा मातेच्या महोत्सवास दक्षिण मुंबईत वरुणाच्या जलाभिषेकाने हर्षोल्हासात आज (गुरुवार) प्रारंभ झाला. महिला शक्तीच्या कर्तुत्वाचा महोत्सव आणि तिच्या मांगल्यमय मातृत्वाचा आदिशक्तीच्या जननी होऊन महिषासुर मर्दिनीच्या हुंकाराचा आवेशाचा दैत्यांचा नायनाट करीत साऱ्या विश्वाच्या रक्षण कर्तीचा महोत्सव म्हणजे दुर्गा नवरात्र महोत्सव होय.

देवी पुराण, देवी महात्म्य, देवी कोष आणि सर्वात महत्वाचा ग्रन्थ  मार्कण्डेय ऋषी रचितं श्री दुर्गा सप्तशती यात आदिमायेची उत्पत्ती, पराक्रम आणि महिषासुर,  चंडमुंड, रक्तबीज या महाबलाढय राक्षसांशी केलेले महायुद्ध त्यात मिळविलेला महाविजय आणि देवीचे अबाधित रहस्य यांचा समावेश या सर्व अध्यायांत मिळून सातशे श्लोकांत वर्णीलेला आहे. हिच दुर्गा देवी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक जगदंबा स्वरूपिणी आदिशक्ति चण्डिका राजराजेश्वरी म्हणून विराजमान झालेली आहे.

दक्षिण मुंबईतील विविध विभागांतील मराठी, गुजराती, मारवाड़ी वस्तीत असलेल्या   मंडळातील मंडपात स्थापित पार्थिव अंबामातेच्या अप्रतिम नख शिखांत शृंगाराने सौंदर्यवती साजत पिवळ्यासाडीत स्थापिलेल्या देवीची सकाळी आराधना सुरु करण्यात आली. प्रथम मुर्तो प्राणप्रतिष्ठापणा, कुलदेवता आवाहन पूजन, श्री गणेश पूजन, षोडष मातृका, नवग्रह पूजन, कलश-शंख, घंटा-दीप पूजन नंतर मुख्य उत्सव मूर्ती श्री दुर्गा देवी आवाहन, षोड शोपचार पूजन, महा अभिषेक, नैवेद्यतांबुलम, महाआरती कर्म समर्पण असा शास्त्रोक्त विधिवत स्थापना सोहळा पार पडला. संध्याकाळी आरती नंतर रास गरबा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

Web Title: mumbai news navratri festival in mumbai