दुय्यम निबंधकाची दोन महिन्यांत चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई - परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे मार्च 2013 ते डिसेंबर 2015 या कालावधीत कार्यरत असलेल्या दुय्यम निबंधकाची दोन महिन्यांत चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी 30 डिसेंबर 2015 ला तक्रार आली होती. त्यानुसार संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार विभागीय चौकशी सुरू आहे. ही चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे ते म्हणाले.