ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींसाठी १८००२२३४६७

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई -  मुंबईकरांना ध्वनिप्रदूषणाची तक्रार १८००२२३४६७ आणि १२९२ या टोल फ्री क्रमांकावर करता येईल. महापालिकेने ही सेवा पुरवली आहे. ध्वनिप्रदूषणासह पदपथावर उभारण्यात येणारे मंडप, पोस्टर, बॅनर याविरुद्ध तक्रारी या क्रमांकावर करता येतील, असे आवाहन पालिकेने केले आहे.

हेल्पलाईन क्रमांक १९१६, व्हॉट्‌सॲप क्रमांक ९९२०७६०५२५ तसेच पालिकेच्या मेलवरही तक्रारी नोंदविता येतील. ध्वनिप्रदूषण निवारण आणि नियंत्रणासाठी सर्व पोलिस ठाण्यांत पदनिर्देशित अधिकाऱ्यांची यादी तयार केली. ही यादी पालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल. रस्ते आणि पदपथावरील मंडपांवर कारवाईसाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.