अंधेरीत ऑनलाईन फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

मुंबई - बॅंकेतून बोलतोय, असे सांगत एटीएमचा पासवर्ड व ओटीपी क्रमांक घेऊन तब्बल ४० हजारांना गंडा घातल्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार साकीनाका परिसरात राहत असून, त्यांना बुधवारी (ता. १९) सकाळी दूरध्वनी आला. आपण बॅंकेतून बोलतोय, असे सांगून एटीएमचा पासवर्ड आणि ओटीपी क्रमांक मागितला. काही वेळाने त्यांना मोबाईलवर मॅसेज आला. त्या वेळी त्यांना खात्यातून ४० हजारांची खरेदी केल्याचे लक्षात आले. त्यांनी साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 