ऑनस्क्रीन असेसमेंटचा मुंबई विद्यापीठात प्रयोग पुन्हा

नेत्वा धुरी
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या गच्छंतीला कारणीभूत ठरलेला ऑनस्क्रीन असेसमेंटचा प्रयोग सत्र परीक्षेतही करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

ऑनस्क्रीन असेसमेंटचा प्रयोग सुरू राहणार आहे; परंतु काही गोंधळ होऊ नये म्हणून विद्यापीठाने सावधगिरीची पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्राध्यापकांचा प्रशिक्षण कार्यक्रम पुन्हा घेण्यात येणार आहे. या माहितीला मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीही दुजोरा दिला. प्राध्यापकांना ऑनस्क्रीन असेसमेंटचे प्रशिक्षण देण्यासाठी चार केंद्रे तयार ठेवण्यात आली आहेत. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ऑनस्क्रीन असेसमेंटमध्ये पुन्हा जुन्या चुका होऊ नयेत म्हणून या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष देण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवरील अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रांवरील वीजपुरवठा खंडित होऊ नये आणि तेथील संगणक नादुरुस्त होऊ नयेत, यावर फोकस करण्यात येणार आहे.