पोलिस डायरी देण्यास पीटर मुखर्जीला विरोध

पोलिस डायरी देण्यास पीटर मुखर्जीला विरोध

मुंबई - शीना बोरा हत्या खटल्यातील आरोपी पीटर मुखर्जीला पोलिस डायरी देण्यास सीबीआयच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात विरोध करण्यात आला.

खटल्यातील माफीचा साक्षीदार श्‍यामवर रायला अटक करणाऱ्या दोन पोलिसांनी तयार केलेली पोलिस डायरी आणि अन्य कागदपत्रे मिळण्याची मागणी मुखर्जीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. या मागणीला सीबीआयने विरोध केला. संबंधित कागदपत्रे महत्त्वाची असून, आरोपीला ती मिळण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही. त्यामुळे केवळ संशयाच्या आधारे अशी कागदपत्रे देता येणार नाही, असा बचाव सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटरजनरल अनिल सिंग यांनी केला. याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com