अक्षयकुमारने पॅडमॅनचे प्रदर्शन पुढे ढकलले

अक्षयकुमारने पॅडमॅनचे प्रदर्शन पुढे ढकलले

मुंबई - संजय लीला भन्साळी यांच्या "पद्मावत' या चित्रपटाशी कोणतीही टक्कर घेण्याचे टाळत बॉलिवूड स्टार अक्षय कुमार याने आपला "पॅडमॅन' या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. "पॅडमॅन'चे प्रदर्शन पुढे ढकलावे, असा भन्साळी यांचा मूड होता. कारण दिग्दर्शक आधीपासूनच मोठ्या समस्येत होता. त्यामुळे आपण या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे अक्षयकुमार याने सांगितले."पॅडमॅन' येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता, मात्र आता तो नऊ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यात येईल. आर. बालकी याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. माझा चित्रपट "पॅडमॅन' हा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता मात्र फिल्मफेअरच्या पत्रकार परिषदेत भन्साळी याच्याशी आपली भेट झाल्यानंतर त्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याची विनंती केली.

आम्ही येथे एक कुटुंब आहोत. मला वाटते भन्साळीचा चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि त्यादृष्टीने मी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com