पैठणीला 'जीएसटी'तून सवलतीची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - पैठणी साडीला वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) सवलत मिळावी, यासाठी वस्तू आणि सेवा कर परिषदेला शिफारस करणार असल्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.

मुंबई - पैठणी साडीला वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) सवलत मिळावी, यासाठी वस्तू आणि सेवा कर परिषदेला शिफारस करणार असल्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.

हातमाग पैठणी साडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे रेशीम आणि जर या कच्च्या मालासोबतच पैठणी विक्रीसाठी "जीएसटी'तून सवलत मिळावी, अशी मागणी करणारी नियम 93 अन्वये सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत जाधव यांनी मांडली होती. या सूचनेला उत्तर देताना केसरकर यांनी सांगितले, की पूर्वी रेशमावर कर लावण्यात येत होता; मात्र पैठणी तयार झाल्यानंतर या कराचा परतावा मिळत होता. नवीन कररचनेनुसार पैठणी तयार करण्यासाठी लागणाऱ्या मजुरीवर "जीएसटी' लावला आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेकडे पैठणीला करातून सवलत मिळावी, अशी शिफारस करणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: mumbai news paithani demand for GST discount