पनवेलमध्ये भरदिवसा रोकड लुटण्याचा प्रयत्न फसला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

पनवेल: येथील ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीची रोकड लुटण्याचा प्रयत्न आज (सोमवार) झाला. परंतु, कंपनीचे व्यवस्थापक अनिल देशमुख यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला.

देशमुख हे टीआयपीएल कंपनीत व्यवस्थापक आहेत. आज दुपारी ते शहरातील शिवाजी रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास देशमुख बँकेतून बाहेर पडले. त्यावेळी मोटारसायकलवरून तीन चोरटे आले. त्यांनी देशमुख यांना काही कळण्याच्या आतच त्यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशमुख यांनी प्रसंगावधान राखून हातातील पिशवी अधिकच घट्ट पकडली. या झटापटीत चोरटे व देशमुख खाली पडले. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. त्यामुळे चोरटे गाडी रस्त्यावरच टाकून पळाले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: