स्पर्धांमध्येही सहभाग घ्या!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पनवेल - प्रगतीच्या दारात पोहोचण्यासाठी प्रत्येकाने अभ्यासाबरोबरच शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. ‘सकाळ’ने तुमच्यासाठी सुरू केलेला ‘ज्युनियर लीडर’ उपक्रम स्तुत्य आहे. या स्पर्धेमुळे तुम्हाला मोठी संधी निर्माण झाली आहे. स्पर्धेत सहभागी होऊन भरघोस बक्षिसे मिळवण्यासाठी त्याचा लाभ घ्या. अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धांतही सातत्याने भाग घ्या, असे आवाहन ‘काय रे रास्कला’फेम अभिनेता गौरव घाटणेकर याने केले. 

‘सकाळ’च्या ‘ज्युनियर लीडर’ स्पर्धेच्या निमित्ताने गौरवने सोमवारी (ता. १७) नवीन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि चांगू काना ठाकूर विद्यालयांतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. 

‘सकाळ माध्यम समूहा’ने मला मुलांसाठी बोलावले त्याबद्दल आभार. ‘ज्युनियर लीडर’ स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला दाखविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे निश्‍चितच त्यांच्या ज्ञानात भर पडेल. तुम्ही स्पर्धेत भाग घ्या अन्‌ भरघोस बक्षिसे लुटा. ‘का रे रास्कला’ विनोदी चित्रपट सर्व वयोगटांसाठी आहे. त्याचाही आनंद घ्या.
- गौरव घाटणेकर

‘सकाळ’तर्फे दर वर्षी शाळेत नवनवीन उपक्रम राबवण्यात येतात. ‘ज्युनियर लीडर’ स्पर्धा विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण व कौशल्य वाढवण्यासाठी आहे. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये लीडरशिप वाढली असून एक लीडर होण्यासाठी त्यांना त्याचा निश्‍चितच लाभ होईल.
- मानसी वैशंपायन (मुख्याध्यापिका, फडके विद्यालय) 

भाषेची आवड निर्माण करण्याचे काम ‘सकाळ’ने केले आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावली आहे. ‘ज्युनियर लीडर’ उपक्रम चांगला आहे. स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
- मंगेश परुळेकर (मालक, ओरियन मॉल)