'ब्लू व्हेल' बंदीसाठी जनहित याचिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

मुंबई - लहान मुलांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमवर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी (ता. 7) या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

सिटिझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर ऍण्ड एज्युकेशन या संघटनेने ही याचिका दाखल केली आहे. या संदर्भातील तक्रारी ऐकण्यासाठी सरकारने 24 तास हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. केंद्राने गुगल, याहू या सर्च इंजिनांसोबत फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियातून "ब्लू व्हेल'च्या सर्व लिंक्‍स कायमस्वरूपी नष्ट करण्याचा आदेश दिला असला, तरी अद्याप अनेक जण हा गेम खेळत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या गेममुळे झालेल्या आत्महत्यांच्या राज्यभरातील घटनांचा उल्लेखही यात केला आहे. न्यायालयाने यासाठी समिती स्थापन करून "सायबर सेल'तर्फे गेमचा प्रसार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.