‘झेंडा उठाव-प्लास्टिक हटाव’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

धारावी  - स्वातंत्र्यदिनानंतर तिरंगा रस्तोरस्ती, मैदान, बाजारहाट व गल्लीबोळात पडलेले दिसतात. तसेच प्लास्टिकचा भस्मासुर रोखण्यासाठी धारावीतील नागरिकांकडून ‘झेंडा उठाव-प्लास्टिक हटाव’ मोहीम बुधवारी (ता. १६) सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत राबवण्यात आली. 

धारावी नागरिक समिती, सावित्रीबाई फुले ग्रंथालय व धारावी झोपडपट्टी पोलिस पंचायत बीट क्रमांक २ यांनी एकत्रितपणे राबवलेल्या ‘झेंडा उठाव-प्लास्टिक हटाव’ या मोहिमेत तिरंग्याची शान राखली जावी आणि प्लास्टिकमुळे भोगावे लागणारे दुष्परिणाम याबाबत जागरूक नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. त्याचबरोबर ‘सकाळ’च्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला पाठिंबा दर्शवित रस्त्यावरील प्लास्टिकच्या पिशव्या व झेंडे जमा केले. या मोहिमेला संत कक्कया मार्गावरील श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल येथून सुरुवात झाली. संत कक्कया मार्ग, धारावी मुख्य रस्ता, संत रोहिदास मार्ग, ९० फुटी कृष्ण मेनन मार्ग या विभागांत ही मोहीम राबवली. 

‘सकाळ’च्या मोहिमेला धारावीतील सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवित ही मोहीम धारावीतील विविध कार्यक्रमांत राबवण्याचा संकल्प त्यांनी केला. गणेशोत्सवातही धारावीत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी उत्स्फूर्तपणे गणेशोत्सव मंडळ पुढे येत आहेत. या मोहिमेत दिलीप गाडेकर, अलका साबळे, अशोक काळे, चतुर्धन गायधनकर, कमल शिंदे, मंगेश खरटमल, शंकर खिल्लारे आदी सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले.

Web Title: mumbai news plastic