मुंबईत प्लॅस्टिक बंदीसाठी महापालिका सरसावली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - प्लॅस्टिकमुळेच मुंबईत पाणी तुंबत असल्याचे कालच्या (ता. 20) पावसातही महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. प्लॅस्टिकचा वापर कमी होत नसल्याने त्यावर बंदी आणण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. आयुक्त अजोय मेहता यांनी याबाबतचे धोरण आखण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्लॅस्टिकच्या सरसकट वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव प्रथम 2007 मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आला होता. संपूर्ण प्लॅस्टिक बंदी करणाऱ्या शिमला शहराचा दौराही महापालिका अधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतर प्लॅस्टिक बंदीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. अखेर कालांतराने प्लॅस्टिक बंदीची चर्चा बारगळली. दरम्यान, 29 ऑगस्ट आणि दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईत पाणी तुंबले. त्यामागे प्लॅस्टिकच असल्याचे निष्पन्न झाले. 

राज्य सरकार उदासीन 
प्लॅस्टिकवर सरसकट बंदी घालण्याचा प्रस्ताव महापालिकेने 2007 मध्ये मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवला; मात्र राज्य सरकारने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. परिणामी प्लॅस्टिकचा उपद्रव सुरूच राहिला. यंदाच्या पावसाने पुन्हा एकदा प्लॅस्टिकचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तरीही राज्य सरकार उदासीन असल्याचे दिसते. 

Web Title: mumbai news plastic municipal corporation