पर्यावरण वाचवा: प्लास्टिक प्रदूषण कमी करा: जुही चावला

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 27 जुलै 2017

मुंबईः पर्यावरण वाचवा: प्लास्टिक प्रदूषण कमी करा, अशी साद अभिनेत्री जुही चावला हिने मुंबईकरांना घातली. शिवाय, 'सकाळ'च्या प्लास्टिक मुक्त मोहिमेचे तिने स्वागत केले.

मुंबईः पर्यावरण वाचवा: प्लास्टिक प्रदूषण कमी करा, अशी साद अभिनेत्री जुही चावला हिने मुंबईकरांना घातली. शिवाय, 'सकाळ'च्या प्लास्टिक मुक्त मोहिमेचे तिने स्वागत केले.

कौंन्सिल फॉर फेअर बिजनेस प्रॅक्टीस यांचे तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री जुही चावला, कल्पना मुंशी, ए वार्ड सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, शेल्ली गुप्ता, डॉली ठाकुर, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजन देसाई, किरण मेहता, कुंती ओझा आदी मान्यवर व्यासपिठावर होते. कार्यक्रमावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

'सकाळ'च्या प्लास्टिक मुक्त मोहिमेचे स्वागत करताना जुही चावला म्हणाली, 'प्लास्टिक हे मानवासाठी अत्यंत घातक असून, ते निसर्ग, प्राणी, पक्षी आणि आपल्या मुलांसाठी हानीकारक आहे. प्लास्टिक मुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. सकाळ माध्यमाच्या प्लास्टिक विरोधी मोहिमेचे मी स्वागत करते आणि सकाळने त्याच्या अभियानात मला बोलावले तर मी नक्की त्यात सहभागी होऊन सहकार्य करेल.'

'13 हजार मनपा कर्मचारी दररोज मरीन ड्राइव, जुहू बीचसह विविध समुद्र किनाऱ्यावर कचरा गोळा करीत आहेत. प्रत्येक दिवशी हजारो टन कचरा गोळा होतोय. अर्बन सिटी आणि लोकसंख्या वाढतेय. रिसाइकल फारच कमी प्रमाणात होतेय. डंपिंग ग्राउंडवर कचरा ओला आणि सुका गाड्यांमधून खाली केला जातोय,' असे ए वार्ड सहाय्यक आयुक्त किरण दीघावकर यांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: