रखडलेल्या निकालांबाबत खुलासा करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

उच्च न्यायालयाचे विद्यापीठाला निर्देश
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या रखडलेल्या निकालाबाबत दोन आठवड्यांत खुलासा करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी विद्यापीठाला दिले.

उच्च न्यायालयाचे विद्यापीठाला निर्देश
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या रखडलेल्या निकालाबाबत दोन आठवड्यांत खुलासा करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी विद्यापीठाला दिले.

बॉम्बे युनिव्हर्सिटी ऍण्ड कॉलेज टीचर्स युनियनने (बुक्‍टु) दाखल केलेल्या याचिकेवर न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

विद्यापीठाच्या ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या पद्धतीलाही बुक्‍टुने याचिकेत आव्हान दिले आहे. अशा प्रकारची नवी पद्धती आणण्यापूर्वी राज्य सरकार आणि विद्यापीठाने नोटाबंदीच्या निर्णयाप्रमाणे पुरेशी यंत्रणा सज्ज ठेवायला हवी, असे मत खंडपीठाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले.

विद्यापीठ, राज्य सरकारसह अन्य प्रतिवादींनाही नोटीस बजावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. विद्यापीठाने ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत आणली; मात्र त्यासाठी आवश्‍यक असलेली इंटरनेट आणि संगणक सामग्री व सुविधा राज्य सरकारकडून उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असा आरोप याचिकादारांनी केला आहे.

विद्यापीठाने एप्रिल महिन्यात दोन कंपन्यांना यासंबंधीचे कंत्राट दिले; मात्र या पद्धतीसाठी अद्ययावत इंटरनेट आणि संगणक आवश्‍यक असून ते नसल्यामुळे विलंब होत आहे, असे याचिकादारांचे म्हणणे आहे.

Web Title: mumbai news Please explain about the exit results