पोलिसांनी वाचवले वृद्ध महिलेचे प्राण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

मुंबई - दहिसर नदीत अडकलेल्या वृद्ध महिलेचे प्राण एमएचबी ठाण्यातील पोलिसांनी वाचवले. नदीत उतररून पोलिसांनी तिला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेऊन तिला त्यांच्या ताब्यात दिले. 

ही वृद्ध महिला दहिसर परिसरात राहते. ती सोमवारी (ता.26) सायंकाळी दहिसर नदीजवळ आली होती. त्या वेळी ती घसरून नदीत पडली. त्या वेळी नदीपात्रात पाणी कमी होते. ती रात्रभर नदीतच पडून होती. दुसऱ्या दिवशी सकाळी एका व्यक्तीने तिला पाहिल्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. काही वेळातच पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी तिला सुखरूप बाहेर काढले. सरकारी रुग्णालयात उपचार करून तिला नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे.