भांडण सोडवणाऱ्या पोलिसाला मारहाण 

भांडण सोडवणाऱ्या पोलिसाला मारहाण 

मुंबई - भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण झाल्याची घटना गुरुवारी (ता.14) सहार गाव परिसरात घडली. याप्रकरणी सहार पोलिसांनी ऍन्थोनी ऊर्फ पीटर रॉड्रिक्‍सला अटक केली आहे. उपनगरात यावर्षी पोलिसाला मारहाण होण्याची ही सहावी घटना आहे. 

पोलिसांवरील हल्ला आणि मारहाणीच्या वाढलेल्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असतानाच सहार परिसरात पुन्हा पोलिसाला मारहाणीची घटना घडली. सहार पोलिस ठाण्यातील शिपाई हेमंत पाटील हे गुरुवारी तलाव पाखाडी येथे गेले होते. त्या वेळी राहुल चव्हाण आणि रॉड्रिक्‍स यांच्यात भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्याचा पाटील यांनी प्रयत्न केला, त्या वेळी रॉड्रिक्‍सने पाटील यांच्यावर दगडाने हल्ला केला. यामध्ये पाटील जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com