मुंबई: मोटारसायकल अपघातात पोलिसाचा मृत्यू

मंगेश सौंदाळकर
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

मुंबई पोलिस दलातील कामगिरी
- भरती 1996 पोलिस नाईक बक्कल क्रं 960070
- मा. पोलिस आयुक्त यांचे कडून बेस्ट डिटेक्शन म्हणून 4 वेळा गौरविण्यात आले
- मा पोलिस आयुक्त यांच्याकडून इतर 20 बक्षिसे
अशी एकूण गुन्हे उघडकीस व गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत करण्यासाठी 128 पोलिस बक्षीसे मिळालेली आहेत.

मुंबई : मोटरसायकल अपघातात पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संतोष एकनाथ शिंदे (वय 42) असे त्यांचे नाव असून ते विले पार्ले पोलिस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत होते.

शिंदे हे 31 ऑगस्टला मुंबईवरून नेरुळ येथे मोटार सायकलवरून जात होते. पहाटेच्या सुमारास वाशी गाव सिंग्नल जवळील ब्रिज जवळील रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे शिंदेंच्या मोटर सायकलला अपघात झाला. डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे तात्काळ एमजीएम रुग्णालय, वाशी येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारा दरम्यान आज (गुरुवार) त्यांचा मृत्यू झाला.

शिंदे हे 1996 साली पोलिस दलात रुजू झाले होते. त्यांना पोलिस आयुक्त यांनी बेस्ट डिटेक्शन म्हणून 4 वेळा गौरविण्यात आले. गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत करण्यासाठी 128 पोलिस बक्षीसे मिळालेली आहेत. शिंदे यांच्यामागे मुलगा विघ्नेश 13 वर्षे व मुलगी सई 8 वर्षे व पत्नी वैशाली 38 वर्षे व आई असा परिवार आहे. 

मुंबई पोलिस दलातील कामगिरी
- भरती 1996 पोलिस नाईक बक्कल क्रं 960070
- मा. पोलिस आयुक्त यांचे कडून बेस्ट डिटेक्शन म्हणून 4 वेळा गौरविण्यात आले
- मा पोलिस आयुक्त यांच्याकडून इतर 20 बक्षिसे
अशी एकूण गुन्हे उघडकीस व गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत करण्यासाठी 128 पोलिस बक्षीसे मिळालेली आहेत.

Web Title: mumbai news police dead on accident