माहीममध्ये मद्यपीची पोलिसाला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मुंबई - मद्यपीने पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. 7) माहीममधील शाहूनगर पोलिस ठाण्यात घडली. आनंद सुब्बया बन्सल असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली. आनंद हा शाहूनगर परिसरातील रहिवासी आहे. त्याने नशेत पत्नीला मारहाण केली होती. नंतर पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील चव्हाण यांनी आनंदला ठाण्यात बोलावून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने दारूच्या नशेत चव्हाण यांची कॉलर पकडून ठोसा मारला. यात चव्हाण जखमी झाले.

मुंबई - मद्यपीने पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. 7) माहीममधील शाहूनगर पोलिस ठाण्यात घडली. आनंद सुब्बया बन्सल असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली. आनंद हा शाहूनगर परिसरातील रहिवासी आहे. त्याने नशेत पत्नीला मारहाण केली होती. नंतर पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील चव्हाण यांनी आनंदला ठाण्यात बोलावून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने दारूच्या नशेत चव्हाण यांची कॉलर पकडून ठोसा मारला. यात चव्हाण जखमी झाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चोरट्याने सांताक्रूझमधील उपनिरीक्षकावरही प्राणघातक हल्ला केला होता. 

टॅग्स