बुडालेले पैसे परत करण्यासाठी 'डीएसके' मालमत्ता विकणार...

बुडालेले पैसे परत करण्यासाठी 'डीएसके' मालमत्ता विकणार...

मुंबई - गुंतवणूकदारांचे बुडालेले पैसे कसे परत करणार, याची योजना दाखल करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतर कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी स्वत:ची मालमत्ता विकण्याची तयारी दर्शवली.

"डीएसके' समूहाच्या कायमस्वरूपी ठेवींमध्ये सुमारे एक हजार 350 गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले आहेत; मात्र या ठेवींचा परतावा ठेवीदारांना अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे या ठेवीदारांचे पैसे कशाप्रकारे परत करणार याचा तपशील द्या, असे न्या. अजय गडकरी यांनी कुलकर्णी यांना सांगितले. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांना अटक न करण्याचे अंतरिम निर्देश पोलिसांना दिले.

गुंतवणूकदारांची रक्कम परतफेड करण्याच्या प्रयत्नात आहे; मात्र त्यासाठी मला काही कालावधी लागेल, असे कुलकर्णी यांच्या वतीने ऍड. अशोक मुंदरगी यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर ज्या मालमत्ता विकणार आहे, त्यांची यादी आणि त्यांचे आजचे बाजारमूल्यचा तपशील दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने त्यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com