व्हीआयपींसाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई - राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपींसाठी) खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रायगडमधील हेलिकॉप्टर घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. "व्हीआयपी' व्यक्तींच्या सुरक्षेची मार्गदर्शक तत्त्वे आणखी काटेकोर करून निर्णय घेणार असल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) सांगण्यात आले. त्याचबरोबर "डीजीसीए'कडून रायगड हेलिकॉप्टर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. सुरक्षेत काही चूक झाली का, याचा तपास होणार आहे.