प्रकाश महेतांच्या अडचणी वाढल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

मुंबई - गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एम. पी. मील कंपाउंडच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महेता यांच्या चौकशीसाठी लोकायुक्‍त नेमण्यास बुधवारी होकार दिला आहे.

पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी महेता यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकारला धारेवर धरले होते. अनेक दिवसांचे कामकाज रोखून धरत महेता यांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात महेता यांची लोकायुक्‍तांकडून चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासोबतच त्यांचा बचाव करत प्रत्यक्षात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याने त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नसल्याचे सांगितले होते. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यपालांनी महेता यांच्या चौकशीसाठी लोकायुक्‍त नेमण्यास होकार दिला असल्याची माहिती राजभवनकडून आज देण्यात आली.