बिझनेस लॉचे प्राध्यापक तपासणार "विधी'च्या उत्तरपत्रिका 

बिझनेस लॉचे प्राध्यापक तपासणार "विधी'च्या उत्तरपत्रिका 

मुंबई - ऑनस्क्रीन असेसमेंटचा पहिला प्रयोग राबवताना मुंबई विद्यापीठातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. स्कॅन्ड उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मनुष्यबळच अपुरे पडल्याने हा गोंधळ झाल्याचे स्पष्ट आले. सत्र परीक्षांमध्ये हा गोंधळ टाळण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याकडे विद्यापीठाच्या हालचाली सुरू आहेत. विधी शाखेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी यापुढे बिझनेस लॉ विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांची मदत घेतली जाणार आहे. 

विधी शाखेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याकरता प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. उत्तरपत्रिका तपासणीसाठी बिझनेस लॉमधून प्राध्यापक गोळा केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बिझनेस लॉ हा विषय विशेषतः वाणिज्य शाखेला शिकवला जातो. शिवाय, या विषयासाठी प्राध्यापकांना एलएलबीचे शिक्षण घ्यावे लागते. एलएलबीची पदवी असल्याने बिझनेस लॉ शिकवणारे प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासण्यास पात्र ठरतात, अशी माहितीही सूत्रांनी दिली. तब्बल 50 प्राध्यापक तयार झाले, तरीही विधी शाखेच्या प्राध्यापकांची कमतरता बऱ्यापैकी दूर होईल. त्यामुळे हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

छायांकित प्रतींसाठी प्रतीक्षाच! 
काही आठवड्यांपासून मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा भवनात फेऱ्या मारत आहेत. छायांकित प्रत देताना विद्यापीठाकडून टाळाटाळ होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यापीठ आणि मेरिट ट्रॅक कंपनीच्या वादात तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांची छायांकित प्रत येणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com