प्राध्यापक संघटना उच्च न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाचा निकाल जाहीर करण्यासाठी विलंब होत असल्याने विद्यार्थी-पालकांचे मनोधैर्य खचत आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्राध्यापक संघटनेकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठाचा निकाल जाहीर करण्यासाठी विलंब होत असल्याने विद्यार्थी-पालकांचे मनोधैर्य खचत आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्राध्यापक संघटनेकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

"मुंबई युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टिचर्स असोसिएशन' (बुक्‍टू) या संघटनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर प्राथमिक सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर झाली. विद्यापीठाने आतापर्यंत 153 निकाल जाहीर केले असले तरी अजून काही शाखांचे निकाल लागण्यास उशीर लागणार आहे. त्यातच कुलगुरूंनी पाच ऑगस्टपर्यंत सर्व निकाल लागतील असे जाहीर करत इतर विद्यापीठांच्या शिक्षकांची मदत घेत असल्याचे स्पष्ट केले असले तरीही या प्रक्रियेत विद्यार्थी-पालक आणि शिक्षकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीतून न्यायालयानेच तोडगा काढवा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. यामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासण्यावरही शिक्षक संघटनेने आक्षेप घेतला आहे. कमी वेळेत अधिक काम करण्याच्या उद्देशाने ऑनलाइन तपासणी (असेसमेंट) सुरू करण्यात आली असली, तरी यात बऱ्याच त्रुटी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी शक्‍यताही याचिकेत वर्तविण्यात आली आहे.
न्यायालयाने मुंबई विद्यापीठासह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावत उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब केली आहे.