पर्यायी व्यवस्था व्हावी: आमदार लोढा 

mla-lodha
mla-lodha

मुंबई: रेल्वे स्टेशनांवरील वाढत्या गर्दीमुळे होणा-या अपघातांना टाळण्यासाठी चर्नी रोडच्या नुकत्याच तुटलेल्या फूटओव्हर ब्रिजला तत्काळ परत उभे केले जावे, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढ़ा ह्यांनी महानगरपालिकेकडे केली व म्हंटले की, अन्य कोणतीही दुर्घटना होऊ नए व लोकांचीही सोय व्हावी, म्हणून हा ब्रिज होईपर्यंत दक्षिणेकडून चर्नी रोड प्लॅटफॉर्मवर पोहचण्यासाठी तत्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली जावी. कारण सध्या सर्व ताण उत्तर बाजूवरील एकमेव ब्रिजवर आला आहे व त्यामुळे कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते.

चर्नी रोड रेल्वे स्टेशनवरील ठाकुरद्वार रोडचा ब्रिज रविवारी रात्री अचानक तुटून पडल्यामुळे लोकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप आहे. भाजपाचे ज्येष्ठ आमदार लोढ़ा ह्यांनी आज मंगळवारी दुपारी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे (डी वार्ड) व वाहतुक विभागाच्या अधिका-यांसह व स्थानिक नगरसेविका डॉ. अनुराधा पोतदार ह्यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचे अवलोकन केले व लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदार लोढ़ा ह्यांनी म्हंटले की, संभाव्य दुर्घटनेला टाळण्यासाठी चर्नी रोड़वर दक्षिणेकडून प्लॅटफॉर्मवर पोहचण्यासाठी महानगरपालिकेने ब्रिज उभा करेपर्यंत तत्काळ पर्यायी व्यवस्था करावी.

विशेष म्हणजे चर्नी रोडवर दक्षिणेकडून प्लॅटफॉर्मला समांतर असलेला स्कायवॉक आधीच तोडून टाकण्यात आला आहे. आणि रविवारी रात्री ठाकुरद्वाररोडवरून येणारा ब्रिज पडल्यामुळे रोज लाखो लोकांना अडचण होत आहे. अन्य पर्याय उरलेला नसल्यामुळे लोक रूळ ओलांडून स्टेशनवर जात आहेत. अशा वेळेस दुर्घटना होण्याची शक्यता वाढली आहे. आमदार लोढ़ा ह्यांनी महानगरपालिकेला ब्रिज होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. ह्या संदर्भात आमदार लोढ़ा ह्यांच्या मागणीवर बुधवारी रेल्वे व महानगरपालिकेच्या अधिका-यांसह व लोक प्रतिनिधींसोबत एक संयुक्त बैठकआयोजित केली गेली आहे. आमदार लोढ़ा ह्यांनी इशारा दिला आहे की, जर ब्रिजचे काम लवकर सुरू केले गेले नाही, तर स्थानिक लोक मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com