फुकट्या प्रवाशांकडून 9 कोटींचा दंड वसूल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास केलेल्या व्यक्तींकडून ऑगस्टमध्ये तब्बल नऊ कोटींचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेसमोर फुकट्या प्रवाशांची डोकेदुखी वाढत असून, या कालावधीत तब्बल दोन लाख 8 हजार व्यक्तींनी तिकीट न काढता प्रवास केल्याचे उघड झाले आहे. फुकट्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेची सध्या विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार विनातिकीट प्रवास आणि सामानाचे तिकीट न काढता वाहतूक केलेल्या प्रवाशांकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मध्य रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक लाख 78 हजार प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. यात यंदा तब्बल 16.90 टक्के वाढ झाली आहे.

मुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास केलेल्या व्यक्तींकडून ऑगस्टमध्ये तब्बल नऊ कोटींचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेसमोर फुकट्या प्रवाशांची डोकेदुखी वाढत असून, या कालावधीत तब्बल दोन लाख 8 हजार व्यक्तींनी तिकीट न काढता प्रवास केल्याचे उघड झाले आहे. फुकट्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेची सध्या विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार विनातिकीट प्रवास आणि सामानाचे तिकीट न काढता वाहतूक केलेल्या प्रवाशांकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मध्य रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक लाख 78 हजार प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. यात यंदा तब्बल 16.90 टक्के वाढ झाली आहे. यंदा दंडरूपाने आठ कोटी 99 लाख वसूल करण्यात आले. याशिवाय 302 प्रकरणांमध्ये दुसऱ्यांच्या नावाच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्यांकडून सुमारे दोन लाख 55 हजार रुपये वसूल केल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. 

Web Title: mumbai news railway fine passenger