मुंबई, नवी मुंबईत हलक्‍या सरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

मुंबई - मुंबई, नवी मुंबई परिसरात मंगळवारी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. पूर्वमोसमी पावसाचा जोर मुंबईत वाढत आहे. सोमवारपासूनच (ता. 29) शहरात पूर्वमोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. आज सकाळपासून अधूनमधून हलक्‍या सरी कोसळल्या. मुंबई शहरासह पश्‍चिम उपनगरांतही पाऊस पडला. दुपारनंतर पश्‍चिम उपनगरांत काही मिनिटे पाऊस पडला.

घामाने चिंब झालेल्या काही जणांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. मॉन्सून केरळात वेळेवर दाखल झाल्याने मुंबईत 6 किंवा 7 जूनला नैर्ऋत्य मोसमी वारे पोचतील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.